Solapur_Rain

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ४ दिवस हलका- मध्यम पाऊस; कृषी शास्त्रज्ञ म्हणतात, शेतकऱ्यांनी पेरणी, आंतरमशागत अन् कीडनियंत्रणावर भर द्यावा, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख ३७ हजार हेक्टर आहे. पावसाअभावी आतापर्यंत केवळ १ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी ४७.६ इतकी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषितज्ज्ञांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिकांच्या अवस्थेनुसार नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्या भागात ८० ते १०० मिमीपर्यंत पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पेरणी पूर्ण करावी.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुढील २४ ते २७ जुलै या चार दिवसांत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, वातावरण ढगाळ राहणार आहे. या काळात थंड वारे वाहतील तसेच रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज विभागीय कृषी संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख ३७ हजार हेक्टर आहे. पावसाअभावी आतापर्यंत केवळ १ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी ४७.६ इतकी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषितज्ज्ञांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिकांच्या अवस्थेनुसार नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्या भागात ८० ते १०० मिमीपर्यंत पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पेरणी पूर्ण करावी. मात्र, कमी पाऊस झालेल्या भागात घाईने पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.

खरीप पिकांमध्ये उडीद, मूग, चवळी, तूर आदी पिकांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पीक पद्धतीत बदल करायचा असल्यास शास्त्रोक्त प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना केली आहे. याशिवाय पिकांवर पाने कुरतडणाऱ्या अळ्या व पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने नियंत्रण उपाययोजना कराव्यात. चवळी पिकात पिवळ्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पांढऱ्या माशीच्या नियंत्रणावर भर देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

फळपिकांची अशी घ्यावी काळजी

फळपिकांमध्ये आंब्यावरील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. सीताफळात पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी. केळीच्या नवीन लागवडीत कंद व मुळे बुरशीनाशक द्रावणात प्रक्रिया करूनच लागवड करावी आणि वाढत्या वाऱ्यांपासून संरक्षणासाठी आधार द्यावा. भाजीपाला पिकांमध्ये रसशोषक किडींवर लक्ष ठेवून पिवळे चिकट सापळे व जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा. जनावरांच्या गोठ्यात पावसाळ्यात चिखल होऊ नये यासाठी कोरडी व्यवस्था ठेवून पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने स्वच्छता राखण्याचाही सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

फळपिकांमध्ये आंब्यावरील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. सीताफळात पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी. केळीच्या नवीन लागवडीत कंद व मुळे बुरशीनाशक द्रावणात प्रक्रिया करूनच लागवड करावी आणि वाढत्या वाऱ्यांपासून संरक्षणासाठी आधार द्यावा. भाजीपाला पिकांमध्ये रसशोषक किडींवर लक्ष ठेवून पिवळे चिकट सापळे व जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा. जनावरांच्या गोठ्यात पावसाळ्यात चिखल होऊ नये यासाठी कोरडी व्यवस्था ठेवून पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने स्वच्छता राखण्याचाही सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

असमान वितरणाची शक्यता

पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता असली तरी तो सर्वत्र एकसमान होईलच असे नाही. त्यामुळे स्थानिक पावसाची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी, आंतरमशागत, कीडनियंत्रण आणि पिकांचे संरक्षण यांचे नियोजन करावे.

- डॉ. नितीनकुमार रणशूर, प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT