liquor liquor
महाराष्ट्र बातम्या

दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर

सध्या आठ प्रकारच्या दारूंचे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्य सरकारने (Decision of the State Government) आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह काही दारूवरील (liquor) उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी (New rates announced) झाली आहे. महाराष्ट्र सरकारने १८ नोव्हेंबर रोजी विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार, उत्पादन शुल्क विभागाने दारूचे नवे दर जाहीर केले आहेत. स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क तीनशेवरून १५० टक्के करण्यात आले आहे.

दारूच्या किमती कमी केल्याने पैसे वाचवण्यासाठी नागरिकांना इतर राज्यातून दारू विकत घेण्याची गरज भासणार नाही. कोणत्याही दुकानदाराने दारूचे दर कमी केले नाही तर त्यांना कारवाईचा समोर जावे लागेल. सध्या आठ प्रकारच्या दारूंचे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच इतर कंपन्यांच्या मद्याचे दरही लवकरच जाहीर (Special fee reduction) केले जातील, असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक शंभर कोटींचा महसूल मिळतो. या शुल्क कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील आयात दारूचे दर कमी झाले आहेत. तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने आणले आहेत. दारूचे दर कमी केल्याने आता तस्करीला आळा बसेल. याशिवाय बनावट दारू आणि चोरीचे प्रकारही कमी होतील, असा दावा केला जात आहे.

दर कमी झालेले दारूचे नवीन दर

  • जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कीची जुनी किंमत ५,७६० रुपये होते. ता आता ३,७५० रुपयांना मिळेल.

  • जॉनी वॉकर रेड लेबल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वा ३,०६० रुपयांनी मिळायची ती आता १,९५० रुपयांना मिळेल.

  • J&B दुर्मीळ मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ३,०६० रुपयांची मिळायची ती आता २,१०० रुपयांना मिळेल.

  • जेमसन ट्रिपल डिस्टिल्ड आयरिश व्हिस्की ३,८०० रुपयांवरून २,५०० रुपयांची झाली आहे.

  • ब्लँटायरची उत्कृष्ट मिश्रित स्कॉच व्हिस्की ३,०७५ रुपयांवरून २,१०० रुपयांची झाली आहे.

  • १२ वर्षे जुनी चिवास रीगल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ५,८५० रुपयांची होती ती आता ३,८५० ची झाली आहे.

  • जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २,४०० रुपयांवरून १,६५० रुपयांची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT