schools holiday sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांच्या सुट्यांची यादी जाहीर! शाळांना या वर्षी 124 दिवस सुट्या; सार्वजनिक सुट्या 76 दिवस; दिवाळी सुटी 12 दिवसांची तर उन्हाळा सुटी 43 दिवस

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. रमझान उपवासानिमित्त उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्या असतील. प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे. यादीतील सुट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ दिवशी असणार सार्वजनिक सुटी

१७ जून (बकरी ईद), २१ जून (वटपौर्णिमा), १७ जुलै (मोहरम, आषाढी एकादशी), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन- पारशी नववर्ष), १९ ऑगस्ट (रक्षाबंधन), २ सप्टेंबर (पोळा), ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी), ११ सप्टेंबर (गौरीपूजन), १६ सप्टेंबर (ईद ए मिलाद), १७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ३ ऑक्टोबर (घटस्थापना), १२ ऑक्टोबर (दसरा), २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी), १५ नोव्हेंबर (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस, नाताळ), १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री), १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमझान ईद), ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे), १ मे (महाराष्ट्र दिन), २ मे ते १४ जून (उन्हाळा सुटी).

मुख्याध्यापकाच्या अधिकारात अन्‌ गावच्या यात्रेचीही सुटी

मुख्याध्यापकाच्या अधिकारात एक सुटी दिली जाते तर गावची स्थानिक यात्रा असेल, त्या दिवशी देखील एक सार्वजनिक सुटी दिली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांमध्ये या दोन सुट्यांचाही समावेश आहे. मुख्याध्यापक अधिकारातील सुटी घेण्यापूर्वी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तीन दिवस अगोदर लेखी कळविणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी दोन पुरुषांना अटक

SCROLL FOR NEXT