book sakal
महाराष्ट्र बातम्या

Literary Award : मुंडले, ढेरंगे, खोपकर, जोशी, वैद्य यांना वाङ्‌मय पुरस्कार

राज्य मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राज्य वाङ्‌मय पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्य मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राज्य वाङ्‌मय पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले.

पुरस्कार विजेत्यांची नावे -

प्रौढ वाङ्‌मय

(वाङ्‌मय प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव)

काव्य - कवी केशवसुत पुरस्कार - श्रीकांत ढेरंगे - आडतासाच्या कविता

नाटक/कविता - राम गणेश गडकरी पुरस्कार - डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे - कुत्रीची हिसेवाटनी

कादंबरी - हरी नारायण आपटे पुरस्कार - सुचिता खल्लाळ - डिळी

लघुकथा - दिवाकर कृष्ण पुरस्कार - कीर्ती मुळीक - वर्तमान

ललितगद्य - अनंत काणेकर पुरस्कार - अरुण खोपकर - प्राक्-सिनेमा

विनोद - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - नीलिमा क्षत्रिय - हॉर्न प्लीज

चरित्र - न. चि. केळकर - डॉ. राजेंद्र मगर - मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे

आत्मचरित्र - लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - संजीव सबनीस - एकला चलो रे

समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन - श्री. के. क्षीरसागर पुरस्कार - सत्यशील देशपांडे - गान गुणगान राज्यशास्त्र/समाजशास्त्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - नीलांबरी जोशी - माध्यमकल्लोळ

इतिहास - शाहू महाराज पुरस्कार- पराग चोळकर - अवघी भूमी जगदीशाची - भूदान-ग्रामदान आंदोलनाची कहाणी

भाषाशास्त्र/व्याकरण - नरहर कुरुंदकर पुरस्कार - डॉ. शैलजा बापट - महानुभाव वाड्मय व्याख्यानप्रणाली ः चिकित्सक समालोचन (भाग १ व २)

विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) - महात्मा जोतीराव फुले पुरस्कार - मिलिंद कीर्ती - कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग ः तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता (खंड पहिला)

शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह - वसंतराव नाईक पुरस्कार - मंदार मुंडले - रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती - ‘रेसिड्यू फ्री’च!

उपेक्षितांचे साहित्य - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार - हिरामण तुकाराम झिरवाळ - जेथोड

अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन - सी. डी. देशमुख पुरस्कार - डॉ. गिरीश वालावलकर - क्रिप्टो करन्सी ः तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि संधी

तत्त्वज्ञान व मानसशास्त्र - ना. गो. नांदापूरकर पुरस्कार - डॉ. अलका देव - अर्थपूर्ण जीवनाचे मानसशास्त्र

शिक्षणशास्त्र - कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार - डॉ. गणपती कमळकर - ऑनलाइन शिक्षणपद्धती

पर्यावरण - डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार - अतुल देऊळगावकर - पृथ्वीचं आख्यान

संपादित किंवा आधारित - रा. ना. चव्हाण पुरस्कार - संपादक ः डॉ. मंदा खांडगे, डॉ. स्वाती कर्वे, डॉ. विद्या देवधर, डॉ. कल्याणी दिवेकर - भारतीय समाजसुधारक आणि विचारवंतांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान (इ. स. १८०० ते २०००)

अनुवादित - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार - अनुवादक ः अलका गरुड - पितळी नोंदवही

संकीर्ण (क्रीडासह) - भाई माधवराव बागल पुरस्कार - जॉन गोन्सालविस - ज्याच्या हाती पुस्तक

बालवाङ्‌मय पुरस्कार -

(वाङ्‌मयप्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव)

कविता - बालकवी पुरस्कार - दासू वैद्य - गोलमगोल

नाटक व एकांकिका - भा. रा. भागवत पुरस्कार - सुरेश शेलार - चार बालएकांकिका

कादंबरी - साने गुरुजी पुरस्कार - सुभाषचंद्र वैष्णव - दुर्गी

कथा - राजा मंगळवेढेकर पुरस्कार - नीलिमा करमरकर - चलो मिरामॅक आणि इतर अद्भुत कथा

सर्वसामान्य ज्ञान - यदुनाथ थत्ते पुरस्कार - मालविका देखणे - शोध लागले अकल्पितपणे

संकीर्ण - ना. धो. ताम्हणकर पुरस्कार - डॉ. सिसिलिया कार्व्हालो - दीपशिखा सरोजिनी नायडू

प्रथम प्रकाशन पुरस्कार -

काव्य - बहिणाबाई चौधरी पुरस्कार - पुनीत मातकर - ऐन विणीच्या हंगामात

नाटक/एकांकिका - विजय तेंडुलकर पुरस्कार - शार्दुल सराफ - जनक

कादंबरी - श्री. ना. पेंडसे पुरस्कार - माणिक पुरी - पक्षी येती अंगणी

लघुकथा - ग. ल. ठोकळ पुरस्कार - विवेक वसंत कडू - चार चपटे मासे

ललितगद्य - ताराबाई शिंदे पुरस्कार - आशालाता दिनेश पडवेकर- आई एक नाव असतं...

समीक्षा सौंदर्यशास्त्र - रा. भा. पाटणकर पुरस्कार - भरतसिंग पाटील - पाण्यारण्य ः तृष्णेची शोधयात्रा

सरफोजीराजे भोसले बृहन् महाराष्ट्र पुरस्कार

सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - विठ्ठल गावस - खाणमाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT