सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. ६ : लोखंडी गजाने दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या सशस्त्र चोरट्यांनी घरात झोपलेल्या दांपत्याला मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफूले व पैंजण ओरबाडून घेतले तर घरातील कपाटातील सोन्याच्या नथ आणि रोख २५ हजार रूपयांसह सुमारे पावणेदोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. आंबळे (ता. शिरूर) जवळील सोनखीळावस्ती येथे आज (ता. ६) पहाटे पावणेदोन च्या सुमारास ही घटना घडली.
विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारांच्या भरवशावर निवडणूक जिंकली, या मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरणे म्हणजे भ्रष्ट प्रयोगाची पुनरावृत्ती होणार आहे, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड.अरहंत धोत्रे, ॲड. रोहित टिळेकर उपस्थित होते.
घाटकोपरच्या दामोदर पार्क येथील मैत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानीला पालिका प्रशासनाकडून मनाई करण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परंतू हायकोर्टाने या संदर्भातील विषय पुन्हा पालिका प्रशासनाकडे टोलविल्यानंतर मात्र पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळे आता पुन्हा एकदा मैत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सदस्य हायकोर्टात पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध दाद मागणार आहेत.
विश्रांतवाडी भागातील धानोरीत सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पोरवाल रस्ता येथे तीन चारचाक्यांवर झाड पडले. चारचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंजाबावस्ती येथे धनेश्वर शाळेजवळ झाड पडले. तर भैरवनगर येथे लेन 10 मध्ये रोहन अपार्टमेंटजवळ एक झाड चारचाकी गाड्यांवर पडले. यामुळे या दोन्ही गाड्यांचे खूप नुकसान झालेले आहे. या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही.
निफाड तालुक्यातील चांदोरी पिपंळस सुकेना निफाडसह परिसरात धुवाधार पाऊस
पहलघम येथील दहशतवादी हल्ल्याचा मंत्र्यांनी निःसंशयपणे निषेध केला. त्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पुन्हा सांगितले की सुरक्षित आश्रय देणे, सीमापार दहशतवादासाठी दहशतवाद्यांच्या प्रॉक्सींचा वापर करणे, दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणे, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करणे, कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करणे आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि हिंसाचाराला चिथावणी देण्यासाठी सायबर स्पेसचा गैरवापर करणे हे मानवतेच्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. त्यांनी यावर भर दिला की दहशतवादी कृत्यांचे गुन्हेगार, आयोजक, वित्तपुरवठा करणारे आणि प्रायोजकांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. या संदर्भात, त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील संयुक्त राष्ट्रांच्या व्यापक अधिवेशनाचा लवकर स्वीकार करण्याचे आवाहन केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील जागतिक दहशतवादविरोधी सहकार्य मजबूत करण्याची आणि संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव, जागतिक दहशतवादविरोधी धोरण आणि FATF मानके पूर्णपणे अंमलात आणण्याची गरज यावर भर दिला: चौथ्या भारत-मध्य आशिया संवादाचे संयुक्त निवेदन
येवला येथील टिळक मैदानात दुधाने अभिषेक करून व मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी भाजपासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शेलकी भाषेत टीका केल्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता येथील शुभांगी शिंदे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणातील आरोपी पतीसह सासरा, सासू व नणंद यांना अटक करण्यात आली. परंतु यातील पाचवा आरोपी संदीप काचगुंडे फरार आहे.
क्रेडाई यांची कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभा आहे त्यांना मी शुभेच्छा देतो
मी आज माजी सगळी टीम घेऊन आलो आहे, कोणतरी आता मला म्हणाले की लवकर निर्णय घेणारा मंत्री आहे
No reason on the spot decision अशी माझ्या कामाची पद्धत आहे
मी देवेंद्र जी, अजित दादा एकत्र टीम म्हणून काम करतोय, जे थांबलेले कामं होती त्यांना आम्ही चालना दिली
मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, कार शेड, अटल सेतू, पुणे मेट्रो यांना चालना देणारे काम यावर लागलेले सगळे स्टे मी काढून टाकले
आमचं प्रगती चे सरकार आहे. काल समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे काम आम्ही बघायला गेलो होतो. लोकांची समृद्धी व्हावी म्हणून आमचं हे समृद्धी सरकार आहे
काम कसे होणार नाही हे सांगायला स्कील लागत नाही, न होणारे काम कसं होईल हे सांगायला लागतं
मी मुख्यमंत्री असताना सगळे म्हणायचं CM मी म्हणायचो कॉमन मॅन
पुण्याची सगळी टीम चांगली आहे, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त
काही अधिकारी असतात ३ वर्ष काढायचं आणि जायचं पण काही जणं असे असतात की.मी या शहराला काही देऊन जाईल
मुख्यमंत्री झालो की आम्ही खड्डे मुक्त मुंबई केली
समृद्धी वर काल मी गाडी चालवली. रस्त्याने शहराची ओळख ठरते
रिअल इस्टेट कोविड मध्ये व्हेंटिलेटर वर गेली असती पण आम्ही थांबवली
रिअल इस्टेट चे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, नाशिक शहरं विकसित झाली पाहिजे
मुंबई पाठोपाठ पुण्याच्या विकासाला गती मिळाली पाहिजे
आपल्या देशाची आर्थिक रँकिंग चौथी आलो आहोत
सगळ्यात जास्त रोजगार देणारा कुठला व्यवसाय मोठा असेल तर तो रिअल इस्टेटचा आहे
३५ लाख घरं पुढच्या ५ वर्षात आम्ही देणार आहोत
सरकारचा एकच अजेंडा आहे डेव्हलपमेंट! सरकारचा १५० दिवसांचा आराखडा तयार केला आहे त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे
मीरा रोडच्या नॉर्थ गार्डन सिटी या संकुलात पुन्हा एकदा बकरी ईदच्या निमित्ताने वाद निर्माण झाला आहे. कुणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर 10 कोटींहून अधिक सायबर हल्ले झाल्याची माहिती पंतप्रधानांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे हल्ले प्रामुख्याने सरकारी वेबसाइट्स, बँकिंग सिस्टम्स आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष्यित होते. सायबर सुरक्षा यंत्रणांनी यापैकी बहुतांश हल्ले यशस्वीपणे परतवून लावले असले, तरी सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर टाकला छापा.
मुक्ताईनगर येथे अवैध रित्या विमल विक्रीसाठी वाहतूक करणारी गाडी वर अन्न व औषध प्रशासन गुप्त वार्ता विभाग नाशिक यांची मुक्ताईनगर मध्ये धडक कारवाई माजी नगरसेवक सह 3 वेक्ती वर गुन्हा दाखल करत 14 लाख 16 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
“राज्य सरकारने नैतिक जबाबदारी घ्यावी. राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी क्षणभरही त्यांच्या पदावर राहू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी प्रतिक्रिया बंगळुरूमधील चेंगराचेंगरीनंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रामदास वसंत सोनवणे या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ३ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहे तर दोन शेळ्या बिबट्या घेऊन गेले आहे.
आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणून जगभर साजरा केला जातो, भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करात साजरा करण्यात आला.
यावेळी अश्वारूढ पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने शिवरायांचा एकच जयघोष करण्यात आला
नाशिकच्या पिंपळगाव येथून लग्नाला जाणारा ट्रक कदवा येथील जाऊळके रस्त्यावर आक्रळे जवळ रस्त्यावर पलटी झाला असून यात 14 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लातूर शहरातील गुमास्ता कॉलनी येथील स्वरूप भीमाशंकर स्वामी हा तीन वर्षाचा चिमूरडा मागच्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झाला होता. अखेर १५ दिवसानंतर हा चिमुरडा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना रडताना आढळला.
नूतन सभापती दिलीप माने यांनी आज पहाटे बाजार समितीला अचानकपणे भेट दिली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, वजन मापे योग्य ठेवा, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या यावेळी त्यांनी भाजीपाला, फळे, फूल विभागास भेटी दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाकडून NEET-PG परीक्षा पुढे; ३ ऑगस्ट ही नवी तारीख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यान अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ झाला.
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी
- धरणात २५०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा
- मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाणीसाठा
- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढ
- यंदा नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्याचा वाद टळण्याची चिन्हं
हगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. पण या कटात बँकेच्या एजंटचा काय सहभाग आहे? हे निश्चित करण्यासाठी आज म्हाळुंगे पोलिसांनी संबंधित बँकेच्या प्रतिनिधींना चौकशीला बोलावलं आहे.
गेल्या ११ वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले आहेत असं सांगत नवं शिक्षण धोरण, कौशल्य विकास तसंच स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्यानं आजची तरुणाई विकसित भारताच्या संकल्पात महत्त्वाचा भागीदार बनली - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाची पाहणी केली. ते लवकरच या पुलाचे उद्घाटन करणार. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जगातील उंच चिनाब पुलाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
कॅफेत नाही तर राज ठाकरेंच्या घरी भेटायला जाणार आहे असे राऊत म्हणाले आहे.
इयत्ता दुसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे.
RBIकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात.रेपो रेट ५.५ वर, रिझर्व्ह बँकेकडून दिलासा
होम लोन, कार लोन कमी होणार आहे.
उत्तर सिक्कीममधील थेंग येथील आर्मी हॉस्पिटलजवळ काल रात्री भूस्खलन झाले. या घटनेत एका वाहनाचे नुकसान झाले आहे. तथापि, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
कोल्हापुरात 351 वा शिवराज्याभिषेक शाही सोहळा नवीन राजवाडा येथे जोरात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते या सोहळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला असून कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या या भव्य समारंभाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. रायगडावरही संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या मनात आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
संत मुक्ताबाई पालखी सोहळा आज मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करणार आहे. या वारकरी सोहळ्याला ३१८ वर्षांची परंपरा लाभलेली असून, या वर्षीही अनेक भाविक खान्देश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाडा येथून दिंड्यासह या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. कोथळी गावात वारकरी हळूहळू दाखल होऊ लागले असून, सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्यासाठी मानाचा बैलजोडीचा सन्मान राजेश प्रकाश पाटील (नाचणखेडा, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) यांना देण्यात आला आहे. ही बैलजोडी मुक्ताईनगरात दाखल झाली आहे आणि भाविकांच्या श्रद्धेने हा सोहळा रंगणार आहे.
नागपूरमधील महाल येथील शिव तीर्थावर श्री शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्याला विधीवत्तेने सुरुवात झाली. शिवप्रेमींनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती केली. या वेळी राज्यभिषेक सोहळा केवळ नृत्य किंवा संगीताने नव्हे तर शिवचरित्राचे पारायण करून साजरा करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमात अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
विदर्भात मॅान्सून सक्रीय होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये १३ ते १४ जूनला मॅान्सून सक्रीय होईल, तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये १७ ते २० जूनपर्यंत मॅान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मॅान्सून २८ मे रोजी गडचिरोलीत पोहोचला असला तरी तो आठ दिवसांपासून तिथेच स्थिरावलेला आहे. या दरम्यान, जिल्ह्यांमध्ये तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उकाड्याचा त्रास सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही दिवस उकाड्याला सहन करावे लागेल.
भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली सुनिता जामगडे यांच्याविरुद्ध कारगिल पोलिसांनी विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रोडक्शन वॉरंट न मिळाल्याने कारगिल पोलिसांनी आवश्यक तपासासाठी आणि पुनर्रिक्रीएशनसाठी नागपूरमध्ये सुनिताला आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सध्या सुनिता नागपूर मधील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे आणि कारगिल पोलिसांनी पुढील आठवड्यात स्थानिक न्यायालयाचा वॉरंट घेऊन नागपूर न्यायालयात पुन्हा अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुनिताचा नागपूर कारागृहातील मुक्काम अधिक काळ टिकण्याची शक्यता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.