State Election Commission esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली! निवडणूक आयोगाच्या पत्रात उल्लेख

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राजातील राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणूकीच्या दृष्टीने जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने लवकरच निवडणूका लागण्याचे मोठे संकेत दिले आहेत. राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने लवकरच निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या राजपत्रात करण्यात आला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकांबाबात देखील अशीच माहिती समोर आली होती. लांबणीवर पडलेल्या राज्यातील पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी वर्तवला आहे.

फडणवीस म्हणाले होते की, 'आम्ही लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT