Uddhav Thackeray Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ''इंडिया आघाडीचा लोगो अन् 38 देशातील पत्रकार...'' मुंबईतल्या बैठकीत नेमकं काय होणार?

संतोष कानडे

मुंबईः येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी या बैठकीचे यजमान आहेत. ३० तारखेला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन बैठकीविषयी माहिती देतील. त्यापूर्वी संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ३८ देशातील पत्रकार बैठकीसाठी येणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीविषयी देशभरात नाही तर जगभरात चर्चा आहे. जगातून 38 पत्रकार बैठकीसाठी येणार आहेत. त्यांनी नोंदणीसाठी आमच्याकडे विचारणा केली असून त्यांना या बैठकीत उपस्थित राहायचं आहे.

राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेने या बैठकीचे यजमानपद स्वीकारलं आहे. 30 तारखेला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन 31 आणि 1 तारखेच्या बैठकीची माहिती देणार आहेत. मुंबईच्या ग्रँड हयात येथे बैठक होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार असून लोगोमध्ये देश आणि देशाची एकता असणार आहे. असं राऊतांनी सांगितलं.

कसा असेल लोगो?

हा देश एकत्र राहण्यासाठी, अखंड भारतासाठी जे आवश्यक आहे ते या लोगोमध्ये आहे. नॅशनल अजेंडा... देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ही आघाडी आहे. नवीन पक्षदेखील आमच्यात सामील होतील, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे इंडिया आघाडीचा लोगो कसा असेल हे १ सप्टेंबर रोजी स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

Latest Marathi News Live Update: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एक कोटींची फसवणूक

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT