sharad pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

संतोष कानडे

पुणेः लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यांमुळे दगदग झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारचे त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

शरद पवारांच्या तब्येतीमुळे सोमवार, दि. ६ मे रोजीचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात रद्द करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या उद्या अनेक सभा आणि अनेक कार्यक्रम नियोजित होते. परंतु तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेवटची सभा संपन्न झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला. रोहित पवार हे भावनिक झाल्यामुळे त्याचा राजकीय मुद्दा बनला आहे. अजित पवारांनी त्यांच्यावर टीका करत मुलभूत प्रश्नांबद्दल बोला, असा सल्ला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT