Lok Sabha Election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election 2024: बारामतीसह राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा काँग्रेस आजपासून घेणार आढावा

राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांची करणार चाचपणी

रुपेश नामदास

मुंबई: हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकहाती विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये लढविलेल्या २३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असला तरी काँग्रेस मात्र बारामतीसह सर्वच जागांचा आढावा घेणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

उद्यापासून ( ता.२ ) बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, आदींचीही उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेसचे माजी मंत्री, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील.

शनिवार, ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरूर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT