bajarang sonawane pankaja munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडमधून ज्योती मेटेंची चर्चा, उमेदवारी मात्र सोनवणेंना

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंच्या बहीण प्रितम मुंडे ह्या बीडच्या दोनवेळच्या खासदार आहेत. तरीही पक्षाने त्यांचं तिकीट कापून पंकजांना उमेदवारी दिली.

संतोष कानडे

Sharad Pawar Group : शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. बीडमधून शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शरद पवार गटाने ३० मार्च रोजी जाहीर केलेली यादी

  • वर्धा- अमर काळे

  • दिंडोरी- भास्कर भगरे

  • बारामती- सुप्रिया सुळे

  • शिरुर- डॉ. अमोल कोल्हे

  • अहमदनगर- निलेश लंके

4 एप्रिल रोजी दोन नावे जाहीर

  • बीड- बजरंग सोनवणे

  • भिवंडी- सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंच्या बहीण प्रितम मुंडे ह्या बीडच्या दोनवेळच्या खासदार आहेत. तरीही पक्षाने त्यांचं तिकीट कापून पंकजांना उमेदवारी दिली.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाईल, असं सांगितलं जात होतं. परंतु बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोनवणे यांनी आठवड्याभरापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. परंतु त्यांचा प्रितम मुंडेंनी पराभव केला होता. आता सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने धनंजय मुंडे आणि सोनवणे यांच्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT