Lok Sabha Election Discussion Between Chief Minister Eknath Shinde Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election : सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बैठकांचे ‘वर्षा’वर सत्र सुरूच; महायुतीत साडेतीन तास खलबतं, कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस 11.30 वाजता वर्षावर दाखल झाले. त्यानंतर रात्री तीन वाजता देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून बाहेर निघाले. यावेळी श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Lok Sabha Election: राज्यासह देशभरात निवडणुकींचा जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच राज्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख देखील उलटली आहे. मात्र, राज्यातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि बैठका यांचे सत्र सुरूच आहे.

काल(शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पहाटे ३ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे.

बैठकीसाठी कोणते नेते होते उपस्थित

बैठकीसाठी सुरुवातील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 11.30 ला वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर उदय सामंत रात्री 12.15 ला वर्षावर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट यांच्यात चर्चा झाली. वर्षावर रात्री उशिरार्यंत तीन वाजेपर्यंत चर्चा झाली.

या बैठकीत कल्याण आणि ठाणे येथील जागेच्या विषयाची चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याणऐवजी ठाणे येथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT