Lok Sabha Election Maharashtra prediction of Anil Thatte- esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election Predictions: अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, जाणून घ्या बिग बॉस फेम अनिल थत्ते यांचं महाराष्ट्राचं भाकीत...

Lok Sabha Election Predictions: २०१९ प्रमाणे वंचित आघाडी डॅमेज करु शकणार नाही. वंचित आघाडीची विश्वासार्हता घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी कोलांट्या उड्या मारल्या.

Sandip Kapde

Lok Sabha Election Predictions

लोकसभा निवडणुकांच्या ६ टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. आता शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार असून ४ जूनला निकाल लागणार आहेत. यापूर्वी अनेक राजकीय विश्लेषक आपले अंदाज व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा दिलेला नारा तर विरोधकांच्या अबकी बार भाजप तडीपार च्या घोषणांनी ही निवडणूक चांगलीच गाजली. दरम्यान भाजपच्या ४०० जागा येणार की तडीपार होणार? यावर राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी माहिती दिली.

अनिल थत्ते म्हणाले, भाजपने ४०० पार, ४०० पार चा एवढा घोषा लावला. आता ३५० जरी मिळाले तरी लोक म्हणणार ४०० कुठं मिळाले. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जास्त असेल असं सर्वांनी गृहीत धरलं होत. पण वातावरण विचलित आणि संभ्रमाच झाल. फडणीवस बोलतात ४५ अमितच शाह बोलतात ४१ आता माझा अंदाज असा आहे की ३५ ते ४० जागा महायुतीला मिळतील.

महाविकास आघाडी ८ ते १३ जागा मिळणार. महाविकास आगाडीचे दोन मुद्दे चांगलेच चर्चेत आले. ४०० पारचं राक्षसी बहुमत जर महायुतीला मिळालं त हे संविधान बदलतील. आपल्या समाजातील मोठ्या वर्गाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाशी जवळचं नातं आहे. तो वर्ग विचलीत करण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले.

दुसरी गोष्ट असं की संविधान बदलले तर एकप्रकारची हुकूमशाही इथं येईल आणि ती मुस्लिमांविरोधात असेल. असं वातावरण तयार झाला त्यामुळे मुस्लिम वर्ग दुखावला तर दलित वर्ग संविधानाच्या मुद्द्यावर दुखावला. तर महायुतीने प्रयत्न केले की मुद्दे कुठले येऊ नये फक्त मोदींचा चेहरा राहावा. त्यामुळे एका चेहऱ्याकरीता महायुतीला मतदान हव आहे तर महाविकास आघाडीने वेगळे मुद्दे मांडले, असे अनील थत्ते म्हणाले. ते टीव्ही ९ मराठी सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे -शरद पवार यांना सहानुभूतीची मिळाली का?

अनिल थत्ते म्हणाले, सहानुभूती नक्की मिळाली. अजित पवार शरद पवार यांच्यामुळे मोठे असं लोकांना वाटते. ते शरद पवारांना दगा देत असतील तर लोकांना आवडणार नाही. वडिलधाऱ्या माणसाला या वयात छेडलं असं लोकांना वाटतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं वाटते की शेवटी बाळासाहेबांचा वारसा त्यांच्याबरोबर आहे. त्यांना धक्का देणे हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रति सहानुभूती आहे.

वंचित आघाडी डॅमेज करणार का?

२०१९ प्रमाणे वंचित आघाडी डॅमेज करु शकणार नाही. वंचित आघाडीची विश्वासार्हता घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी कोलांट्या उड्या मारल्या. आधी म्हणाले शिवसेनेसोबत युती झाली, नंतर सर्वांसोबत ते विरोधात गेले. त्यामुळे जाणवत होतं की ते आघाडी करण्यास उत्सुक नाही. ते कारणे शोधत राहिले. त्यामुळे वंचितमुळे कोणताही नकारात्मक परिणाम निकालावर होणार नाही.

देशात ३२५ ते ३५० जागा देशात एनडीएला मिळतील. राज्यात महायुतीला ३७ ते ४० असा अंदाज आहे. इतर महाविकास आघाडीला मिळतील, असा अंदाज अनिल थत्ते यांनी व्यक्त केला.

बारामतीचं काय होणार?

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काम केलं आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. अजितदादांच्या इच्छेसाठी त्यांची पत्नी उभ्या राहील्या, असा प्रकार बारामतीत आहे. लोक याबद्दल अनुकूल असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे विजयी होतील असं मला वाटते.

राज्यातील दोन जागांवर शंका -

दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव आहेत तिथे मला शंका होती. पण तेथील मतदार भाजपचा लॉयल आहे. त्यामुळे दुसरी जागा रविंद्र वायकर आणि अमोल किर्तीकर यांची आहे. दोघांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. किर्तीकरांकडे फक्त खिचडी आहे तर वायकरांकडे अख्खी प्लेट नाही. तिथे कदाचीत अमोल किर्तीकर येतील.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

नारायण राणे यांनी सर्व पुण्याई कामाला लावली. पण त्यांच्या दोन मुलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. ते निवडून आले तर स्वताच्या बळावर येतील. जर पराभूत झाले तर त्याला कारण त्यांचे मुलं असतील.

ठाणे जिल्हा -

ठाण्यात शिवसेनेचे दोन गट आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांना आनंद दिघेंचे वारसदार म्हणून पाहिल्या जाते. आनंद दिघेंवर आलेल्या चित्रपटाने चांगलचं वातावरण निर्माण केलं. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे अशी प्रतिमा तयार झाली. ठाण्यात ठाकरेंना सहानूभुती मिळणार नाही. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तीन लाखाने येतील तर ठाण्यात नरेश म्हस्के दिड लाखाने निवडून येतील.

अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही -

अजित पवार यांना एकही जागा मिळणार नाही, असं मला वाटते. अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुती आणि अजित पवार यांच्यात फारकत होईल. राज ठाकरे देखील महायुतीपासून दूर होतील. विधानसभेत जागांवरुन वाद होतील. राज ठाकरे यांचं कुणासोबत देखील पटणार नाही. त्यांचं कोणासोबतच पटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT