Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok sabha Election: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून 'या' नेत्याला तिकीट; उद्धव ठाकरेंची घोषणा

कार्तिक पुजारी

मुंबई- लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. लोकसभेसाठी कोणाला सधी मिळणार याची इच्छूक नेत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केलीये. या जागेवरुन अरविंद सावंत यांना तिकीट दिले जाणार आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत निवडणूक लढवतील अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनीच याची घोषणा केल्याचं सांगण्यात आलंय. तसेच येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे कळते.

लोकसभा निवडणुका सात महिन्यांवर आहेत. त्यामुळे पक्षांकडून मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेतला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही दक्षिण मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला. अरविंद सावंत यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राखली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

विधानपरिषद, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचं कळतंय. मतदारसंघात जाऊन काम करा आणि निवडणुकीसाठी तयारी करा असं उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले आहेत. शिंदे गटाने वेगळी चूल मांडली असल्याने येत्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या गटाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! नाशिकची धुरा गिरीश महाजनांकडे; भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

CSK New Coach: "आधी, MS Dhoni ची संघातील भूमिका काय ते निश्चित करा अन् मग कोच शोधा"; CSK ला दिग्गजाकडून स्पष्ट सल्ला

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

Money Horoscope: हातात पैसा अन् नशिबात राजयोग! १८ ऑगस्टनंतर राशींचे दिवस पालटणार, नशिबाची पेटी उघडणार अन् पैशांचा पाऊस पडणार!

SCROLL FOR NEXT