Lok Sabha Elections 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगर दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपचे सुजय विखे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभा घेतली.

Sandip Kapde

Lok Sabha Elections 2024: इंडिया आघाडीतील मोठे नेते जेलमधून बाहेर आले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालूप्रसाद यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आज नगरमध्ये सुजय विखे आणि शिर्डी लोकसभा उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

मुस्लिमांना 'संपूर्ण' आरक्षण मिळालेच पाहिजे या राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याने राजकीय वादळ निर्माण झाले. टीकेवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चारा घोटाळ्यात जामीनावर असलेले नेते आहेत. जे तुरुंगात होते आणि चारा घोटाळ्यात दोषी ठरले. ते म्हणतात मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं, फक्त आरक्षण नाही, ते म्हणतात की मुस्लिमांना ‘संपूर्ण’ आरक्षण मिळायला हवं, याचा अर्थ काय?  यांना एसटी, एसी, ओबीसी सर्व गरीबांचे आरक्षण मुस्मिम समाजाला द्यायचे आहे.

जोपर्यंत मी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष भारताची ओळख मिटवू देणार नाही, अशी शपथ मोदींनी घेतली. काँग्रेसने अनेक वर्ष देशातील नागरीकांचा विश्वासघात केला. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशाच्या हिताचे मुद्दे नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

२६\११ बाबात काँग्रेस नेत्यांचे विधान धक्कादायक आहे. काँग्रेसची हतबलता समोर आली आहे. जवान कुणामुळे शहीद झाले हे संपूर्ण देशाला माहित आहे. काँग्रेसचे नेते कसाबची बाजू घेत आहेत. मुंबईतील हल्ल्यात शहीद झालेल्यांचा हा मोठा अपमान आहे. काँग्रेसला देशातील प्रत्येक वर्गाने नाकारले असल्याचे मोदी म्हणाले.

त्यांचे नेते, जे तुरुंगात आहेत आणि चारा घोटाळ्यात दोषी ठरले आहेत.” कोर्ट… तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे… तो म्हणाला की मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं, फक्त आरक्षण नाही, ते म्हणतात की मुस्लिमांना ‘संपूर्ण’ आरक्षण मिळायला हवं, याचा अर्थ काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT