Ajit Pawar Balasaheb Thorat may meet CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

"सत्तेत राहून सरकारविरोधात आंदोलन नको"; मुख्यमंत्री शिंदे अजित पवार गटावर नाराज?

कार्तिक पुजारी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक वर्षावर बोलावली होती. यावेळी त्यांनी आमदार-खासदारांना लोकसभेसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. पुढील वर्षी एप्रिल महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील. महायुतीला एकत्र निवडणुका लढायच्या आहेत, असं शिंदे बैठकीत म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भाष्य केलं. सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणावरुन मंत्रालयात केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीयांची भूमिका एकच असायला हवी. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे बैठकीत म्हणाले.

एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेसाठी सर्व मतदारसंघामध्ये जोमाने तयारीला लागा. सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांनी एकजुटीने राहावे आणि एकमेकांशी समन्वय ठेवावा. तसेत एकमेकांशी वाद टाळा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

जोमाने काम करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जिंकून द्यायचं आहे. त्यामुळे मतदारसंघात मोर्चबांधणी करायला सुरु करा. सत्तेत राहून सरकारवरील टीका कटाक्षाने टाळा. एकमेकांवर टीका-टिप्पणी करु नका. आरक्षण आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मराठा आरक्षण देताना इतर आरक्षणाला आपल्याला धक्का लावायचा नाही, असं बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT