Loksabha 2019  Pravin Gaikwad will get Congress ticket from Pune
Loksabha 2019 Pravin Gaikwad will get Congress ticket from Pune 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : प्रवीण गायकवाडांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार का?

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरी काँग्रेस पक्षाला पुण्यातून उमेदवार पक्का करता आला नाही. पुण्यातील अनेक इच्छूकांची नावे दिल्लीपर्यंत पाठविण्यात आली आहेत. पण उमेदवार निश्चित झालेला नाही. अशातच मुळ काँग्रेसचे नसलेले परंतु, पुण्यातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. या निमित्ताने आज प्रवीण गायकवाड यांनी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शविल्याचे सांगितले जात आहे. 

मागील अनेक दिवसांपासून पुण्यातून लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरु आहेत. अशात काही दिग्गज काँग्रेसी नेत्यांनी आपआपली ताकद आजमावून लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी वरिष्ठांकडे लॉबींग सुरु केले होते. पण या सगळ्यांना बाजूला सारून संभाजी ब्रिगेड संघटनेत अनेक वर्षांपासून काम करणारे प्रवीण गायवाड लोकसभेच्या टिकीटावर बाजी मारणार असेच दिसत आहे.

दोन आठवड्यापुर्वीच गायकवाड यांनी बारामती येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या मागे आगामी निवडणूकीची व्यूहरचना असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. आता दिल्लीत जाऊन मल्लिकार्जून खर्गे यांच्या भेटीनंतर या चर्चेला आणखी जोर येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT