Loksabha Bypoll 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Bypoll: पुणे व चंद्रपूरमध्ये पोटनिवडणूक कधी? मे महिन्यापासून दोन्ही मतदारसंघात खासदार नाही

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता आता मावळली आहे. राज्यातील या दोन मतदारसंघातील मतदार जवळपास एक वर्ष लोकसभा मतदारसंघ हे खासदाराशिवाय राहणार आहेत.

सध्या देशात चार लोकसभा मतदारसंघ रिक्त आहेत. यात उत्तरप्रदेशातील अंबालाचे भाजपचे खासदार रतनलाल कटारिया यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून या मतदारसंघात खासदार नाही. उत्तरप्रदेशातील गाझीपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अंसारी यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. (latest marathi news)

या मतदारसंघातही गेल्या १ मे पासून निवडणूक झालेली नाही. अफजल अंसारी यांनी भाजपचे नेते व सध्या जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा पराभव केला होता. १८ मे रोजी पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले तर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाले आहे. या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक शक्यता वर्तविली जात होती. काही जणांनी तयारीही सुरू केली होती.

परंतु निवडणूक आयोगाकडून कोणतेही संकेत न मिळाल्याने ही तयारी आता थंडबस्त्यात पडली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असला तर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर करणे अपेक्षित आहे. विविध राज्यांच्या सात विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या. (Pune Latest News)

मात्र त्यावेळीही या लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर न केल्याने आता या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. या मतदारसंघातील मतदारांना आता नव्या खासदारासाठी पुन्हा सात ते आठ महिने वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT