Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेवर कुरघोडी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेत ‘माझं ते माझं अन्‌ तुझ्याकडचंही माझंच’ अशी खेळी खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याआधी शिवसेनेने भाजपला झुलवत ठेवले होते. या वेळी ठाकरे यांच्या मागण्या मान्य करून कोणत्याही परिस्थितीत युती करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आणि शिवसेनेच्या मागणीनुसार पालघर मतदारसंघ शिवसेनेला देऊन टाकला.

भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत भाजपला शिवसेनेने घाम फोडला होता. ही बाब भाजप नेते आणि फडणवीस यांना सलत होती, असे भाजपातील एका बड्या नेत्याने सांगितले. युती झाल्यानंतर फडणवीस यांनी आपले कौशल्य पणाला लावत श्रीनिवास वनगांचा पत्ता कट करत भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारीसाठी त्यांचा शिवसेनेत प्रवेश करविला आणि आता गावित निवडणूक लढवत आहेत. त्यावेळी वनगा यांना विधिमंडळात पाठविण्याचे आश्‍वासनही फडणवीस यांनी दिले आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडे उमेदवार नाही, ही बाब ओळखून नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून लढवा, असा निरोपही ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’वर पाठविण्यात आला आणि त्यातही फडणवीस यशस्वी झाले.

गावित, पाटील भाजपच्याच पाठीशी
लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी राजेंद्र गावित आणि नरेंद्र पाटील हे भविष्यात भाजपच्याच पाठीशी उभे राहतील, अशी तजवीज मुख्यमंत्र्यांनी केल्याचे भाजपातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT