Digital-Slip 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019 : घरोघरी डिजिटल स्लिपा

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरीकरणाच्या वाढत्या विस्तारात अनेकदा मतदानाचे केंद्र कुठे आहे, याचा शोध घेणे जिकिरीचे होते. परंतु, त्यावर उमेदवारांनी उपाय शोधला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांच्या थेट घरी जाऊन यंत्राद्वारे मतदार स्लिप वाटण्यास सुरवात केली आहे. यामुळे मतदान केंद्र शोधणे सोईचे होणार आहे.

पुणे आणि बारामती मतदारसंघात मंगळवारी (ता.२३) मतदान होत आहे. यापूर्वी लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यादीत त्यांची नावे शोधून लेखी स्लिप घरोघरी पोचवत असत किंवा मतदाराला केंद्रावर जाऊन यादीतून बूथ शोधावे लागत होते. आता तंत्रज्ञानाचा फायदा घेत पक्षांनी डिजिटल स्लिपांचा पर्याय स्वीकारला आहे. त्यांनी कार्यकर्ते घरोघर पाठवून या स्लिपा वाटण्यास सुरवात केली आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात कार्यकर्ते एका यंत्रावरून स्लिप काढून देत आहेत. त्याची प्रणाली समजून घेतली असता त्यांनी सांगितले, की सर्व मतदारांची माहिती असलेला ॲप तयार करून घेतला आहे. त्यामध्ये सर्व माहिती असते. एक छोटा वायरलेस प्रिंटर त्याला जोडलेला असतो. मतदाराचे नाव ॲपवर शोधले की, त्याचे मतदान केंद्र कोठे आहे, याची माहिती मिळत आणि ती प्रिंट करून आम्ही देतो. पुणे शहरातील उमदेवारांनीदेखील याच पद्धतीने स्लिप देण्यास सुरवात केली आहे. मतदारांना स्पिलद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्याबरोबरच पक्षाची जाहिरात करण्याची संधीदेखील राजकीय पक्ष घेत आहे. या स्लिपवर वरती पक्षाचे चिन्ह आणि त्याखाली मतदाराच्या नावासह, त्याचा अनुक्रमांक, बूथ क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आणि केंद्रातील कोणत्या रूममध्ये मतदानासाठी जायचे आहे, याची माहिती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले; सत्कार स्वीकारायला आले अन्...

Ahmedabad Plane Crash: जळालेली झाडे अन् काळवंडलेल्या भिंती; अपघाताला महिना झाल्यानंतर वसतिगृहाची स्थिती

Education News: विकसित महाराष्ट्रासाठी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; उच्च, तंत्रशिक्षण विभागाचा पुढाकार

Parbhani Teacher Video: गुरुजींचा ‘मॉर्निंग पेग’, दारू पीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल | Sakal News

Nashik Godavari River : गोदापात्रात सापडले दोघांचे मृतदेह; तीन दिवसांनंतर अग्निशामक विभागाच्या शोधमोहिमेस यश

SCROLL FOR NEXT