Sharad Pawar Latest News  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

''विरोधक जर मला म्हणत असतील तर की, दादांना संधी कुणी दिली तर माझं म्हणणं हे आहे की, प्रत्येकाला राजकीय जीवनात काम करत असताना कुणी ना कुणी संधी देतच असतो. पवार साहेबांना चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून ते ६७ ला आमदार झाले. पुढे पवार साहेबांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं. परंतु त्यांनी वसंतदादांचं सरकार पाडलं. तेव्हा सगळे म्हणत होते पाठीत खंजीर खुपसला.''

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांनी पक्षासह वेगळी चूल मांडली. त्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक. त्या अनुषंगाने 'सकाळ'चे राजकीय संपादक विजय चोरमारे यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला.

अजित पवारांना पहिली संधी शरद पवारांनीच दिली, तरीही त्यांनी त्यांची साथ सोडली अशी टीका अजित पवारांवर सातत्याने होते. त्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काहीही चुकीचं केलं नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. पवार साहेब हे यशवंतराव चव्हाण साहेबांचे मानसपुत्र होते. चव्हाण साहेबांनीच त्यांना पहिलं तिकीट दिलं.

आमचे विरोधक जर मला म्हणत असतील तर की, दादांना संधी कुणी दिली तर माझं म्हणणं हे आहे की, प्रत्येकाला राजकीय जीवनात काम करत असताना कुणी ना कुणी संधी देतच असतो. पवार साहेबांना चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून ते ६७ ला आमदार झाले. पुढे पवार साहेबांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं. परंतु त्यांनी वसंतदादांचं सरकार पाडलं. तेव्हा सगळे म्हणत होते पाठीत खंजीर खुपसला.

''वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचा पवार साहेबांनी फोन घेतला नाही. लोक माझे सांगातीमध्ये हे सगळं लिहिलं आहे. अजित पवार बोलतो ते खरंच बोलतो. तेव्हा कुणीतरी फोन उचलला आणि, आता दोर कापले आहेत असं म्हणून फोन आदळला..'' असं म्हणत त्यांनी शरद पवारांनी संधी दिली म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT