Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून मिशन 48 ची घोषणा केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने (BJP) मोर्चेबांधणी केली असून 'मिशन 48' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

(Loksabha election 2024, BJP Announced Mission 48)

"लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा." असा संदेश विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत आज काही वेळापूर्वी यासंदर्भातील बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात ही बैठक झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा सामावेश असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं आहे.

"पुढच्या 17 ते 18 महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचं आहे. राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत." असं मत फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान "सध्या काँग्रेस करत असलेले आंदोलन चुकीचं आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी चालू आहे, त्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. कोर्टावर दबाव आणण्याचं काम सध्या काँग्रेस करत आहे. ते करत असलेलं आंदोलन चुकीचं आहे." असं मत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

"एमआयएमने शिवसेनेला मतदान करून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत केली आहे. ही शिवसेनेची बी टीम आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांनी आमच्या विषयी वक्तव्य करू नये." असा आरोप त्यांनी केला आहे. भाजप कोणत्याही पक्षाला टार्गेट करून ही निवडणूक लढवत नाही असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची संधी नाकारली आहे तो त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे असं ते म्हणाले आहेत. दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपात पाहायला मिळणार आहे. २० जून रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT