Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: मविआत जागा वाटपावरून गोंधळ! प्रकाश आंबेडकरांची थेट काँग्रेसला ऑफर...वंचितची नेमकी भूमिका काय?

Prakash Ambedkar: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार ठरवत आहे. मात्र महाविकास आघाडीचं जागावाटप अजून झालं नाही.

Sandip Kapde

Prakash Ambedkar:  निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार ठरवत आहे. मात्र महाविकास आघाडीचं जागावाटप अजून झालं नाही. कोण कीती जागा लढणार, यावर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह सुरु आहे. प्रकाश आंबेडकर देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष्य मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खर्गेजी यांना विनंती केली आहे की मला, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रकारचा आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे."

प्रकाश आंबेडकरांच्या या नवीन भूमिकेमुळे राजकीय खळबळ माजली आहे. मल्लिकाअर्जून काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काही गोष्टी मी पत्रात सांगितले नाही. पण महाविकास आघाडीत आतापर्यंत १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोण कुणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. ५ जागा अशा आहेत, जिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. त्यांनी जागा सोडल्या नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पक्षाने ही भूमिका घेतली की आपण महाविकास आघाडीतील हिस्स्याला ज्या जागा येतील. त्या जागांवर काँग्रेस पक्षाने आम्हाला सांगाव. आमच्या मदतीने ते जिंकू शकताता, त्या सात जागांवर वंचित त्यांना पाठिंबा देईल. आम्ही प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. ही ऑफर आमची कायम आहे.

वंचितच्या ताकदेमुळे भाजप महाराष्ट्रात ढासळलेली आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी त्यांना पक्ष फोडल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष उभा केला. त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

"शेवटच्या दिवशी मेघाने..." बिग बॉस मराठी पहिल्या सीझनच्या विनरविषयी आस्तादचा धक्कादायक खुलासा

मालिकेने निरोप घेताच नवी सुरुवात; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई; ग्रहमखचे फोटो व्हायरल

Raj Thackeray Eknath Shinde Meeting : राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राज्याच्या राजकारणात नवे समीकरण ? चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT