Gajanan Kirtikar sakal
महाराष्ट्र बातम्या

Gajanan Kirtikar : मविआला चांगल्या जागा मिळतील! गजानन कीर्तिकर यांच्या दाव्याने शिवसेनेत खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली लढत दिली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील,असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज आघाडीच्या विजयाचा दावा केला. कीर्तिकर यांच्या या दाव्याने महायुती विशेषतः शिवसेनेत खळबळ उडाली असून निवडणूक निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली लढत दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाच त्यांनी यावेळी केला.

‘मी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दीड-दोन वर्षांपूर्वी गेलो, त्यावेळी माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, याची खंत वाटते,’’ असेही कीर्तिकर यांनी सांगितले.जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.

मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी वडिलांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

आईचा पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचा प्रचार करू शकलो नसल्याची खंत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मेघना या मुलगा अमोल याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. विशेष म्हणजे कालच त्यांनी याबाबतची भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. त्यानंतर आज गजानन कीर्तिकर यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केल्याने शिवसेनेच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files उघड! फोटो सोडा... १८ अन् १९ सेकंदाचा व्हिडिओ देखील व्हायरल, बेडरूम, स्नानगृह अन् रहस्यमय खोली...

Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघात

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT