dr. neelam gorhe Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dr. Neelam Gorhe : महायुतीचे ४५ जागा जिंकण्याचे ध्येय

‘लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीने ४५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘महायुतीने सहा लाख ८६ हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. यासाठी एक हजार १७५ नामांकित उद्योजक व त्यांच्या औद्योगिक संघटना आणि प्लेसमेंट संस्था यांच्याशी सामंजस्य करार केले.

नागपूर, लातूर, बारामती, अहमदनगर आणि ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्यातून दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांमधील नक्षलग्रस्त क्षेत्रात ‘कौशल्य विकास कार्यक्रम’, गडचिरोली येथे दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या आहेत.’

मुंबईतील वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन उभारण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या १८ हजार ३३१ रिक्त पदांवर भरती, आणखी विविध विभागांच्या १७ हजार ४० पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरकारने १ लाख ५३ हजारांपेक्षा अधिक रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मतदानाचा हक्क बजावावा

मतदानासाठी भरपगारी सुटीची अंमलबजावणी करण्यास निवडणूक आयोगाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. राज्यात आतापर्यंत मागील दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT