mahayuti maharastra  esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024 : महायुतीच्या सात उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्तात!

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात उद्या (ता.१९) मतदान होईल पण अद्यापही तब्बल सात मतदारसंघात उमेदवार कोण हे महायुतीने घोषित केलेले नाही.

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात उद्या (ता. १९) मतदान होईल पण अद्यापही तब्बल सात मतदारसंघात उमेदवार कोण हे महायुतीने घोषित केलेले नाही. २०१९ साली भाजपने राज्यातल्या २५ लोकसभा जागा लढवल्या होत्या. आज नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपने हा आकडा गाठला आहे.

महायुतीत दोन नव्या पक्षांना सामावून घेतले असले तरी भाजपची राजकीय जागा राज्यात कमी झालेली नाही. युती करताना भाजपचे नुकसान होवू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने बोलत असत. गेल्या वेळी शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. त्यातील १३ खासदार शिंदेंसमवेत आले.

शिंदेंवर अन्याय होवू देणार नाही, असे भाजपने नमूद केले असले तरी अद्याप शिवसेनेच्या शिंदे गटाला केवळ १० जागा मिळाल्या आहेत. अद्याप घोषित व्हावयाच्या सात पैकी तीन जागा शिंदे गटाला मिळतात काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे गट विरोधी आघाडीत २१ जागा मिळवू शकला आहे. किती जागा मिळाल्या, यापेक्षा किती जिंकतात ते बघू, असा टोमणा शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मारला. शिंदे गटाला औरंगाबाद नाशिक, ठाणे आणि मुंबईतील दोन मतदारसंघ मिळाले तर ही संख्या तब्बल १५ वर जाईल आणि पालघर तसेच मुंबईतील केवळ एक जागा घेत भाजप २७ वर थांबेल. भाजपची २८ मतदारसंघात लढण्याची इच्छा असल्याचे समजते.

मविआतर्फे शरद पवार गट दहा जागा लढत असताना महायुतीतल्या अजित पवार गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. मात्र फुटीच्या वेळी केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार बाहेर पडलेल्या या पक्षाचे लक्ष विधानसभेकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे आणि पालघर यापैकी एक किंवा दोन्ही मतदारसंघ भाजप मागून घेईल.

भाजपचा आक्रमक डाव

दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे आणि औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करणे तर दूर अद्याप नावेही ठरवण्यात आलेली नाहीत. भाजपने नारायण राणेंना उमेदवारी देत कोकणात प्रवेश करण्यासाठी आक्रमक डाव खेळणे पसंत केले आहे. कॉँग्रेसने केवळ १७ जागा लढून गेल्या वेळेपेक्षा कमी आकड्यांवर समाधान मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT