Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली PM मोदींची ऑडिओ क्लिप; भर सभेत केला हल्लाबोल

Sharad Pawar : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीची मोठी तयारी सुरू आहे. तर राज्यातील नेते सभेमध्ये प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब येथे बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू असल्याचा टोला लगावला. यासोबतच त्यांनी भरसभेत नरेंद्र मोदी यांचं 2014 मधील भाषण ऐकवलं आहे. मोदींनी दहा वर्षात फक्त नोटबंदी केली असल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

मोदींनी २०१४ साली पन्नास दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत ५० टक्के खाली आणणार, असं आश्वासन दिलं होतं. मात्र पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गॅस ११०० रूपयांवर गेला आहे. २०१४ साली मोदींनी बेकारी कमी करून हाताला काम देऊ असं म्हटलं होतं, परंतु बेकारी कमी झाली नाही. १०० पैकी ८७ तरुण बेकार आहेत, असं म्हणत शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या आश्वासनांची यादी वाचत हल्लाबोल केला आहे.

मोदींनी आजवर गॅस, वीज, तरुणांना रोजगार याबाबत दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप देखील पवारांनी भरसभेत ऐकवली आहे. ऑडिओ क्लिप ऐकवत गेल्या दहा वर्षांत तुम्ही काय केलं? असा सवाल देखील शरद पवारांनी मोदींना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT