Loksabha Election 45 MP 200 MLAs will elected Chandrasekhar Bawankule aurangabad
Loksabha Election 45 MP 200 MLAs will elected Chandrasekhar Bawankule aurangabad esakal
महाराष्ट्र

Loksabha Election : राज्यातून ४५ खासदार, २०० आमदार निवडून येतील; चंद्रशेखर बावनकुळ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकार बुलेट ट्रेनप्रमाणे काम करीत आहे. यामुळे पाच वर्षांतील कामे दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली जनभावना आता कमी झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेगटाचे ४५ खासदार आणि विधानसभेत दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.

संघटनात्मक बैठकीनिमित्त बावनकुळे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की महाविकास आघाडीने विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ बरखास्त केले. १२ आमदारांच्या नियुक्त्यांशी त्यांचा संबंध जोडला. १२ आमदार नियुक्त करा मगच विकास मंडळे पुनरुज्जीवित करतो अशी मागासभागांविरोधी भूमिका घेतल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली. आता शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे. २०२४ च्या निवडणुकीत राज्यात ५१ टक्के मते मिळविण्याचे नियोजन आम्ही केले आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे.

शहांवरील आरोप म्हणजे सूर्याला दिवा

जेव्हा महाविकास आघाडी केली तेव्हा निवडणुका घ्या, असे ठाकरे म्हणाले नाहीत. आता राज्यात विधानसभा निवडणुका घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेले आव्हान हे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याचा धसका घेतला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT