voting 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ‘नोटा’ला पाच लाख मते

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की या पाच लाख लोकांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. मात्र अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत दिले नाही. ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्‍याचा इशारा असल्याचे मानले जाते.

राज्यात चार टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान झाले. यामध्ये भाजपला २३, शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा सफाया होताना केवळ एकमेव जागा मिळाली आहे. मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपला २७.६ टक्के (१ कोटी ४९ लाखांहून अधिक) मते मिळाली. शिवसेनेला २३.३ टक्के (१ कोटी २५ लाख ८९ हजारांहून अधिक) मते मिळाली. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला १६.३ टक्के (८७ लाख ९२ हजारांहून अधिक), तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५.५ टक्के (८३ लाख ८७ हजारांहून अधिक) मते मिळाली. इतरांना १४.६ टक्के (७८ लाख ६५ हजारांहून अधिक) आणि ‘नोटा’ला (४ लाख ८८ हजारांहून अधिक) मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT