annabhau sathe
annabhau sathe 
महाराष्ट्र

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठेंचे असामान्य लेखन

सकाळ वृत्तसेवा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते.

पुणे- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. ज्ञानाचे धनी असलेले साठे हे शाळेत शिकले नाहीत. ते फक्त दीड दिवस शाळेत गेले. तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला. अण्णा भाऊ साठे यांनी दोन लग्न केली.

साठे एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलितांमधील खदखद त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साठे यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते मार्क्सवादी-आंबेडकरवादाकडे वळले. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण तरीही उच्चवर्णीयांचे राहिलेले वर्चस्व त्यांना मान्य नव्हते. त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" अशी मोर्च्यातील घोषणा होती.

दलित आणि कामगारांच्या जीवनातील सत्य परिस्थिती व्यक्त करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी कथांचा वापर केला. "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" असं ते १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात उद्घाटन भाषणात म्हणाले होते. साठे यांनी विपूल लेखन केले. त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे. फकिराला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्यांचे १५ लघु कथा संग्रह आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

साठेंनी लिहिलेली पुस्तके

अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)

अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)

अमृत

आघात

आबी (कथासंग्रह)

आवडी (कादंबरी)

इनामदार (नाटक, १९५८)

कापऱ्या चोर (लोकनाट्य)

कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)

खुळंवाडा (कथासंग्रह)

गजाआड (कथासंग्रह)

गुऱ्हाळ

गुलाम (कादंबरी)

चंदन (कादंबरी)

चिखलातील कमळ (कादंबरी)

चित्रा (कादंबरी, १९४५)

चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)

नवती (कथासंग्रह)

निखारा (कथासंग्रह)

जिवंत काडतूस (कथासंग्रह)

तारा

देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)

पाझर (कादंबरी)

पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)

पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)

पेंग्याचं लगीन (नाटक)

फकिरा (कादंबरी, १९५९)

फरारी (कथासंग्रह)

मथुरा (कादंबरी)

माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)

रत्ना (कादंबरी)

रानगंगा (कादंबरी)

रूपा (कादंबरी)

बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)

बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)

माझी मुंबई (लोकनाट्य)

मूक मिरवणूक(लोकनाट्य)

रानबोका

लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)

वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)

वैजयंता (कादंबरी)

वैर (कादंबरी)

शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)

प्रवासवर्णन

कविता आणि माझा रशियाचा प्रवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT