Lonavala Accident sakal
महाराष्ट्र बातम्या

Lonavala Accident : भुशी दुर्घटनेतील कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत;अजित पवार,दुर्घटना रोखण्यासाठी फलक

लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले.

भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी विधानसभेत केली. विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Raigad Traffic: जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला केराची टोपली; पालीत अवजड डंपर वाहतूक सुरूच, नागरिक संतप्त

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT