land slide esakal
महाराष्ट्र बातम्या

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; रेल्वे वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे.

धनश्री ओतारी

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.(lonavla khandala land slide on pune mumbai railway traffic stopped)

आज शुक्रवार असल्याने विकेंडमध्ये अनेक जण मुंबई ते पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, भल्यापहाटेच घाट परिसरात दरड कोसळ्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्या नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्यानं मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मात्र, अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.

सकाळी सहा नंतर पुण्याहून निघालेल्या रेल्वे खंडाळ्याला थांबल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे कर्जतला थांबविल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT