Mahavikas Aghadi ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi: 'इच्छा असेपर्यंतच महाविकास आघाडीत' ठाकरे गटाने वाढवलं मविआचं टेन्शन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी विरोधक ‘एकजूट’ करीत असतानाच महाविकास आघाडीत राहण्याबाबत भूमिका मांडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.

‘जोपर्यंत आमची इच्छा आहे; तोपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू, ’ असे वक्तव्य राऊत यांनी रविवारी केले. विशेष म्हणजे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असेही राऊत यांनी सूचित केले.

शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिरात राऊत यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी भावी मुख्यमंत्र्यांचा मुद्दा उकरून काढत, राऊत यांनी आघाडीतील घटक पक्षांतील तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेत्यांना इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांतील नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे, राऊत यांच्या भूमिकेमुळे आघाडीसोबत सत्ताधारीही अवाक झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा विद्यमान मुख्यमंत्री असा उल्लेख करत राऊत म्हणाले, ‘‘सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्रिपदाचे पीक जोरात आहे. पाहावे तिकडे भावी मुख्यमंत्री दिसत आहेत.

आपण महाविकास आघाडीसोबत आहोत आणि जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. ज्यावेळी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) पुढे बसले आहेत. ते काही आमच्या इच्छांवर नाही. ते राजकारण आहे.’’

मोदी, शहाही शिवसेनेत येतील

न्यायालयाने हे सरकार घटनाबाह्य ठरवले असून, पुढील ५० दिवसांत नवे सरकार आणायचे आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही शिवसेनेत येतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला. अहमदाबादमध्ये क्रिक्रेटचे मैदान उभारून, मुंबईतील क्रिकेटचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोपही राऊत यांनी केला.

खोके दिन साजरा करा

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ‘‘मिंधे सरकारने खोके दिन आणि जागतिक गद्दार दिन साजरा करावा,’’ असा खोचक टोला आदित्य यांनी शिंदे यांना लगावला.

शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला असतानाही १८ जूनला शुभेच्छा दिल्या जात असल्याचे सांगून आदित्य यांनी त्यांची खिल्लीही उडवली. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकविण्याचा प्रयत्न होत आहे. पण कदापीही तसे घडणार नाही, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT