Walase Patil_All Party Meet 
महाराष्ट्र बातम्या

भोंग्याबाबत केंद्रानं निर्णय घेतल्यास राज्यातही लागू करु - गृहमंत्री

राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारने निर्णय घेतला तर राज्यात वेगळी परिस्थिती राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारने निर्णय घेतला तर राज्यात वेगळी परिस्थिती राहणार नाही.

राज्य सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे आज सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. यादरम्यान या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, भोंग्यांसंदर्भातली विषयावर आम्ही केंद्राशी बोलू. इतर राज्यात काय परिस्थिती आहे ते ही तपासून घेऊ. आज बैठकीत आतापर्यंत जे जीआर निघाले त्याआधारे निर्णय घेत आहोत. पोलिस विभगाशी बोलून नव्याने गाईड लाइन्स काढणार आहेत का यावरही चर्चा केली जाईल. आम्ही सर्व एकत्र काम करत असतो. आरोप सगळे करतात आता त्या आरोपांचा कंटाळा येतो, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले आहे.

दरम्यान, मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालो. मात्र आम्ही अमच्या मतावर ठाम आहे. याप्रकरणी मार्गदर्शक सूचना काय असाव्या हे सरकारनं ठरवलं पाहिजे. मनसेचा 3 मेचा अल्टिमेटम कायम आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT