mns
mns esakal
महाराष्ट्र

मनसेचे महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीकाही केली. राज्य सरकारनं मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय घेतला नाहीतर मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान, आज चांदिवली विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यालयाबाहेर महेंद्र भानुशाली यांनी भोंगे लावले होते. यानंतर भानुशाली यांना पोलिसांनी समज दिल्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळं अखेर पोलिसांनीच कार्यालयाबाहेरील भोंगे उतरवले आहेत. या घटनेत महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुंबई घाटकोपर येथील मनसे कार्यायलयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असं राज ठाकरे काल म्हणाले होते. पोलिसांनी अगोदर समज देऊन त्यानंतर भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती आहे. मनसेचे चांदिवली विभागातील कार्यालयासमोरील झाडावर लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यात आले आहेत. मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चिरागनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्यानं ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय म्हणालेत महेंद्र भानुशाली

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज भोंगे लावणे सुरू होते. आज चांदीवलीमध्ये त्याची सुरुवात झाली आहे. मात्र अचानक काय झालं आणि पोलिस दबावू आणू लागले. भोंगे लावले म्हणून 5 हजार 50 रुपयांचा फाईन लावला. भोंगे परत लागले तर कारवाई करू असेही सांगण्यात आले. मात्र परत भोंगे मिळाले तर मी परत लावणार आहे. मी गणपती बाप्पाची आरती सुरू केली आहे. हा फक्त मनसेचा टिझर आहे. पुढे बघा, असा इशारा भानुशाली यांनी दिला आहे. आम्ही मनसेचे कार्यकर्ते सक्षम आहोत, असेही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT