LPG Cylinder sakal
महाराष्ट्र बातम्या

LPG Cylinder : ५२ लाख बहिणींना मिळणार सिंलिडरचे अनुदान ; मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आदेश जारी

राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या सवलतीसोबतच जोडून आपले घोडं दामटविण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या सवलतीसोबतच जोडून आपले घोडं दामटविण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारभावात ८३० रुपयाने विकल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत ३०० रुपयांची सवलत दिली जाते, तर यापुढे राज्य सरकार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडरचे उर्वरित ५३० रुपये अनुदान बॅंक खात्यात जमा करणार आहे.

राज्य सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार केंद्राच्या ‘पंतप्रधान उज्ज्वला योजने’च्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना ही योजना लागू होणार आहे. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ती गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलिंडरसाठी ५३० रुपये अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. सुरुवातीला सिलिंडर पूर्ण रक्कम देवून खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर अनुदानाची रक्कम बॅंक खात्यात जमा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT