महाराष्ट्र बातम्या

LPG Cylinders: आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला 2 सिलेंडर मिळणार

घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे

सकाळ डिजिटल टीम

घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका घरगुती एलपीजी कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत.

त्याचबरोबर एका महिन्याचा कोटाही आता निश्चित करण्यात आलाय. कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता योणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवो तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ 15 सिलेंडरच मिळणार आहेत.

अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त 12 सिलेंडर मिळणार आहेत. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागेल.

तर, नवीन नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत असलेल्या एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलेंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलेंडर असू शकत नाही. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त पैसे द्यावे लागत असतील, तर त्याचा पुरावा देऊन ग्राहकाला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT