madam commissioner book by meeran borwankar allegation on ncp ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: मीरा बोरवणकरांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप!

कार्तिक पुजारी

मुंबई- माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे.

पुस्तकात नेमकं काय म्हणण्यात आलंय?

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, असं त्यांनी मला सांगितल्याचं बोरवणकर पुस्तकात म्हणाल्यात.

येरवाडा पोलिस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, असं त्या पुस्तकात म्हणाल्या आहेत.

मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही. तीन एकर जागा एका खासगी बिल्डरला देण्यात आली. या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार होते असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मंत्र्यांनी माझं ऐकलं नाही, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण झाला, असंही पुस्तकात म्हणण्यात आलंय. बोरवणकर यांच्या बुधवारी प्रकाशीत होणाऱ्या पुस्तकावरुन राजकारण तापू लागलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली. आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सरकारविरोधात उद्रेक पाहायला मिळत आहे. आयपीएस बोरवणकर यांच्या पुस्तकात वास्तव मांडण्यात आले आहे, असं पटोले म्हणाले.

संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार असं ते म्हणाल आहेत. दरम्यान, अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT