rajesh tope Sakal
महाराष्ट्र बातम्या

पिक्चर बघा अन् आरोग्य जपायचं शिका; आरोग्य विभागाचा हटके उपक्रम

समाजात घडत असलेल्या अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटतांना दिसते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. चित्रपट हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. चित्रपट हा मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचीदेखील महत्त्वाची भूमिका साकारण्याचे काम करत असतो. त्यात लघूपट हा भावना जागृत करणारा असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

समाजात घडत असलेल्या अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटतांना दिसते. या माध्यमाचा वापर जनजागृती आणि लोकशिक्षणासाठी करण्यात आल्याची उदाहरणे आपण बघितली आहे. याच धर्तीवर हा चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. मनोरंजनातून लोकशिक्षण हा यामागील उद्देश आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण तयार केलेली फिल्म 7 मार्चपर्यंत iecmaff22@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT