Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

आमदार निधीमध्ये होणार मोठी वाढ; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्र्यांची ही माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील आमदार निधीमध्ये (MLA Fund) आता मोठी वाढ करण्यात येणार आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी विधानसभेत केली. सध्याच्या ४ कोटी रुपयांवरुन हा निधी ५ कोटी रुपये करण्यात येणार आहे. म्हणजे या आमदार निधीमध्ये एक कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. (Maha Govt has decided to increase MLA fund from 4 crore to 5 crore)

अजित पवार म्हणाले, "आपल्याकडं आमदारांचा स्थानिक विकास निधी हा ४ कोटी रुपये होता तो आता ५ कोटी रुपये जाहीर करतो. खासदारांनाही केंद्र सरकारनं ५ कोटी रुपये निधी देण्यास टाळाटाळ केली. पण महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक आमदाराला ५ कोटी रुपयांचा निधी पुढील वर्षापासून देणार आहे"

त्याचबरोबर आमदारांच्या ड्रायव्हरला १५ हजार रुपये पगार आहे तो आता २५ हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना २५ हजार रुपये पगार आहे, तो ३० हजार रुपये करण्यात येत असल्याची घोषणाही यावेळी अजित पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

Pune PWD: पुणे ‘पीडब्ल्यूडी’चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही

SCROLL FOR NEXT