salary esakal
महाराष्ट्र बातम्या

बोनस नाहीच! ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यंदा बोनस जाहीर झालेला नाही मात्र, ऑक्टोबर महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याद्वारे राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री यांनी घेतली. (Maha govt takes decision about advance salary of October month before Diwali Festival)

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना दिवाळी साजरी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी देण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार, हा पगार २१ ऑक्टोबरपूर्वी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात, असं शासनानं आपल्या आदेशात म्हटलं.

यासाठी वेतन देयकं होण्यासाठी सर्व पूर्तता केलेली वेतन देयकं त्वरीत कोषागारात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे आदेश विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृतवेतनधारक यांना देखील लागू असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT