maha vikas aghadi government Do not hate and attack language Uddhav Thackeray Marathi Bhasha Bhavan
maha vikas aghadi government Do not hate and attack language Uddhav Thackeray Marathi Bhasha Bhavan sakal
महाराष्ट्र

‘मविआ’ सरकार सक्रिय; भाषेचा द्वेष अन आक्रमणही नको!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मराठी ही छत्रपती शिवाजी महाराज याची भाषा आहे. छत्रपतींनी मातृभाषेला वैभव व स्वातंत्र्य मिळवून देत राजभाषेचा मुकुट चढवला. त्यामुळे आपण इतर भाषेचा द्वेष न करता मराठी भाषेवरचे आक्रमण होऊ देऊ नये,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मराठी भाषा भवनच्या भूमिपूजन सोहळ्यात केले.

चर्नी रोडवर उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनच्या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, हे भव्यदिव्य भाषा भवन देशालाच नव्हे तर जगातील अभ्यासक आणि पर्यटक यांचे आकर्षण ठरेल. आजपर्यंत भाषा भवन उभारण्याच्या चर्चा आणि बैठका झाल्या. चर्चेतून आराखडा तयार होतो पण काम होत नाही. आपण आज प्रत्यक्ष काम करत आहोत. याचा अभिमान आहे.’’

महाराष्ट्र अर्थव्यवस्थेचा आधार

वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते.

ठाकरे म्हणाले, की कोणतेही संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत ‘अर्थबळ’ लागते ते वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळत असल्याने राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा विभाग भक्कम झालाच पाहिजे. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे. आज भूमिपूजन होत असलेली वास्तू प पर्यावरणपूरक असून ती २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल. अजित पवार म्हणाले, की कोरोना संकटाशी राज्यातील सर्वजण ज्या एकजुटीने, निर्धाराने लढले, त्याची नोंद इतिहासात निश्चितच होईल.

मराठीचा अपमान सहन करणार नाही

मराठी भाषेत बोला, असे म्हटले की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहिती आहे. मला त्याची काळजी नाही. असे स्पष्ट करताना ठाकरे म्हणाले की, जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. प्रत्येकाला इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अशा शब्दात ठाकरे यांनी मराठीचा गौरव केला.

पोलिस तंदुरुस्त हवेत ...

‘‘धावत जाऊन गुन्हेगारांना पकडण्या इतके आपले पोलिस तंदुरुस्त असावेत. अनेकांची पोटं पुढे आली असून त्यांना धावता येईल की नाही अशी स्थिती आहे. व्यक्तिमत्त्व दिमाखदार अन रुबाबदार असावे. पोट आत असेल तर व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. शिडशिडीत मुख्यमंत्र्यांकडे पाहिल्यावर हेवा वाटतो,’’ अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली.

जनतेच्या सेवेसाठी पोलिसांचे ‘डायल ११२’

महाराष्ट्र पोलिस दलाकडून जागतिक दर्जाचे काम व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारमार्फत पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी खंबीर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रल हॉल मध्ये शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या ‘डायल ११२’ आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्‍घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाकरे यांच्या हस्ते झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की बदलत्या काळातील नवीन आव्हाने म्हणून सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी, आर्थिक गैरव्यवहार अशा सर्व प्रकारच्या आव्हानांना आपले पोलिस दल सक्षमपणे सामोरे जात आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल ११२ जनतेचे फोन तत्काळ व विना अडथळा घेता यावेत, यासाठी नवी मुंबईत प्राथमिक संपर्क केंद्र व नागपूरला दुसरे संपर्क केंद्र उभारले आहे. डायल ११२ यंत्रणेद्वारे मदत घेण्यासाठी नागरिक लँडलाइन व मोबाईल फोनद्वारे संपर्क करू शकतात. असे कॉल संपर्क केंद्राद्वारे संबंधित जिल्ह्याच्या पोलिस नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येतील, त्यासाठी पोलिस दलातील ११ पोलिस आयुक्तालये व ३४ जिल्हे अशी एकूण ४५ पोलिस नियंत्रण कक्ष अद्ययावत केली आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT