mahajob 
महाराष्ट्र बातम्या

नोकरी शोधताय... मोबाईलमधूनच ‘येथे’ करा ऑनलाईन नोंदणी, ही आहेत महाजॉब्सची खास वैशिष्टये

सकाळ वृत्तसेवा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा स्थितीत अनेकांवर बेरोजगारी ओढवली आहे. अनेकांचे वेतन कपात केले जात आहे, तर काहींच्या नोकऱ्या जात आहेत. लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. त्याबरोबर उद्योजकांनाही कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘महाजॉब्स’ वेब पोर्टल सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवले जात असून ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहेत. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीने ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरू केले. महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणा-या उद्योगांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे.

महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करत आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर ‘महाजॉब्स’ वेब पोर्टल उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी, यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी अनेकांना मदत होईल.

कोविड- १९ हे केवळ आरोग्य संकट नव्हे तर आर्थिक संकट म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ टक्के वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणाऱ्या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाला उत्तर देताना उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे. कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. याचा अनेक युवक युवतींनी लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. 

या संकेतस्थळावर अशी करा नोंदणी...

१‘महाजॉब्स’ या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावा.
२ प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.
३ त्यानंतर तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरावयाची आहे. 
४ याबरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहितही देवू शकता. 
५ त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करा.
६ यानंतर सबमिट करा. 
७ तुम्ही नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल.

ही कागदपत्रे अपलोड करावीत...

- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे.
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- कौशल्य प्रमाणपत्र
- फोटो

मदतीसाठी येथे संपर्क साधा...

महाजॉब पोर्टलसंबंधी कोणत्याही मदतीसाठी आपण आमच्या ग्राहक सेवा नंबरवर फोन करू शकता( ०२२-६१३१६४०५) किंवा ईमेल आयडी वर ईमेल करू शकता.

या पोर्टलची उद्दिष्ट्ये आहेत...

- नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
- निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
- उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
- महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT