Mahanand Dairy esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahanand Dairy : महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा; पाच वर्षांचा करार अन्...

मुंबईतल्या गोरेगाव येथे असलेली महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंदा डेअरीचा ताबा दिला आहे.

संतोष कानडे

मुंबईः महानंद डेअरीवरुन मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी घमासान केलं होतं. इतर उद्योगाप्रमाणे महानंददेखील गुजरातला हलवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप केला होता. त्यानंतर आता 'महानंद'बाबत वृत्त येत आहे.

महानंद डेअरीचा ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडे गेला आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांची उपकंपनी असणाऱ्या गुजरातचया मदर डेअरी यांना 'महानंद' चालवण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र येथून निघणारे उत्पादन महानंदा नावाने असणार आहे.

मुंबईतल्या गोरेगाव येथे असलेली महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंदा डेअरीचा ताबा दिला आहे.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोगबत पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला असून एवढा काळ महानंदा डेअरी बोर्डच्या ताब्यात असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक पुन्हा रान उठवणार हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT