Chief Minister Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंच्या हस्तेच होणार आषाढीची महापूजा, ECची सशर्त परवानगी

नगरपालिकांच्या निवडणुकीमुळं आचारसंहिता लागू झाल्यानं नवा पेच निर्माण झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अचारसंहितेमुळं पंढरपुरात आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता हा संभ्रम दूर झाला असून CM शिंदे यांच्या हस्तेच सपत्नीक आषाढीची महापूजा पार पडणार आहे, यासाठी निवडणूक आयोगानं हिरवा कंदील दाखवला आहे. उद्या रविवारी विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. (Mahapuja of Vitthal will be held hands of CM Shinde Green signal of EC)

राज्यात काल नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली त्यामुळं लगेचच आचारसंहिताही लागू झाली आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हा प्रशासनानं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत परवानगी मागितली होती. यावर आता निवडणूक आयोगानं सशर्त परवानगी दिली आहे.

CM शिंदेंच्या दौऱ्यासाठी 'या' अटी घातल्या

पंढरपूरच्या दौऱ्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही निधीची आणि कार्यक्रमांची घोषणा करता येणार नाही.

पंढरपूरमधील ठरलेल्या कार्यक्रमांना नियमानुसार परवानग्या घेणं आवश्यक

कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा असल्यास ठराविक अटींचं पालन करणं आवश्यक

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा कसा आहे कार्यक्रम?

एकादशी दिनी पहाटे शासकीय महापूजा होणार

विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन

सकाळी ११ वाजता स्वच्छता दिंडी, दुपारी शिवसेना पक्षमेळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT