ॲक्युपंक्चर  esakal
महाराष्ट्र बातम्या

आज राज्यभरात अ‍ॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा

अ‍ॅक्युपंक्चर परिषदेमार्फत रविवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आणि राज्याबाहेरील ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या क्षेत्रात‍ करिअर आणि व्यवसाय करणाऱ्या व्यावसायींसाठी राज्य अ‍ॅक्युपंक्चर परिषदेमार्फत रविवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून या परीक्षेसाठी तब्बल ७ हजार ७६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी ६ हजार ३८४ व्यावसायी या परीक्षेला बसणार असल्याची माहिती परिषदेचे प्रबंधक, नारायण नवले यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा मागील वर्षी घेण्याचे नियोजन हेाते, त्यासाठी परिषदेकडुन १ जानेवारी २०२० पासूनच अ‍ॅक्युपंक्चर व्यवसायींकडुन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात परिषदेकडे एकुण ७ हजार ७६५ ऑनलाईन अर्ज आले असून त्यातील पात्रता आणि निकष पूर्ण केलेल्यांपैकी ६ हजार ३८४ उमेवार परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेला बसणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांना युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच इमेल आणि मोबाईल त्यांना मेसेजही पाठविण्यात आल्याचे नवले यांनी सांगितले.

या परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अॅड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप द्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असली तरी त्यात आयफोनचा वापर करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय काही अडचणी असल्यास त्यासाठी परिषदेने https://www.mahacucouncil.org या संकेतस्थळावर परीक्षेासाठी माहिती उपलब्ध करून दिली असल्याचेही सांगितले

काय आहे अ‍ॅक्युपंक्चर परिषद...

राज्य सरकारने ॲक्युपंक्चर चिकित्सा पध्दती अधिनियम, २०१५ अन्वये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केलेली आहे. ही देशातील पहिलीच ॲक्युपंक्चर परिषद ठरली असून या परिषदेतर्फे राज्यातील व राज्याबाहेरील ॲक्युपंक्चर व्यवसायींची नोंदणी प्रक्रिया केली जाते. त्यांच्यासाठी पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र विद्यामान कायदयानुसार परिषदेचे कार्यक्षेत्र राज्यभर निश्चित करण्यात आले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT