Maharashtra on alert as kayar cyclone effect increases in arabian sea 
महाराष्ट्र बातम्या

क्यारची तीव्रता वाढणार; महाराष्ट्राची दिवाळी पावसातच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या सकाळी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी पडण्याची शक्‍यता असून, मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात घोंगावणारे क्‍यार हे चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत. 

अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या क्‍यार चक्रीवादळाची पुढील चोवीस तासांमध्ये तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळ होणार आहे. त्यानंतरच्या बारा तासांमध्ये अतितीव्र चक्रीवादळ होईल. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. 

क्‍यार हे चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीपासून 210 किलोमीटर, तर मुंबईपासून 370 किलोमीटर अंतरावर आहे. ते ओमानच्या दिशेने सरकरण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. या दरम्यान "क्‍यार'ची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढेल. 

पुणे शहर आणि परिसरात सप्टेंबरच्या शेवटी स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून दमदार पाऊस पडला. त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ऑक्‍टोबरच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहरात पावसाच्या सरी पडत आहेत. तर आता क्‍यार या चक्रीवादळामुळे आलेल्या बाष्पांमुळे शहरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून पाऊस पडत आहे. 
यंदा दिवाळीत थंडी जाणवत नसून पुणेकरांना जुलै-ऑगस्टमध्ये काढलेले रेनकोट, जर्किन, छत्र्या अजूनही वापरत असल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पुण्यातील रस्त्यांवर दिसत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

SCROLL FOR NEXT