Bhagatsingh koshyari Leaves Vidhan Bhavan 
महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल आले नि लगेच निघाले; विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; वाचा घटनाक्रम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिल्या. (Budget Session Maharashtra Assembly)

विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळातआक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आल्या.

वाचा सविस्तर घटनाक्रम:

  • राज्यपाल आल्यावरच घोषणाबाजी सुरु. राष्ट्रगीत होऊ द्या, अशी विनंती केली.

  • राष्ट्रगीतानंतर भाषणाला सुरुवात, शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेंव्हा 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणाबाजी सुरु झाली.

  • मुख्यमंत्र्यांनी हात वर करुन घोषणा थांबवण्याची विनंती केली.

    त्यानंतर मग 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा देण्यात आल्या.

  • भाजप आमदार राम सातपुते फलक दाखवलं. 'नवाब मलिक हा दाऊद साथीदार'

  • नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली.

  • राज्यपालांनी या गोंधळातच भाषण उरकलं आणि फाईल बंद करून निघून गेले

  • त्यांच्या अनुपस्थितीच राष्ट्रगीत झाले.

या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलंय की, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसं नाहीये. त्याबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT