Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023 
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session: पहिल्या दिवशी अधिवेशनात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget Session 2023: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेचं आजच्या दिवसभराच कामकाज संपलं असून उद्या दुपारी 12 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. (Maharashtra Assembly Budget Session first day Shinde Fadnavis government)

तर पहिल्या दिवशी अधिवेशनात काय काय घडलं?

अधिवेशनला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आणि भविष्यातील कामांचा लेखाजोखा अभिभाषणात मांडला.

यात ७५ हजार तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा निर्णय, मराठा समाजासाठी विशेष योजना, पेन्शन योजनेत सुधारणा, राज्यात विविध क्षेत्रात नोकरभरती सुरू, केंद्राप्रमाणे राज्यातही आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना आदी बाबींचा उल्लेख राज्यपालांनी केला.

आमदार नसतनाही मिलिंद नार्वेकर सभागृहात

आमदार नसतनाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सभागृहात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. सुरक्षारक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर नार्वेकर उठून बाहेर गेले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सूचनेनुसार नार्वेकर बाहेर पडले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा- छगन भुजबळ

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच, अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली. मराठी भाषेचं वय अडीच हजार वर्षे झालं असून मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी आहे. यामध्ये राजकारण न आणता पाठपुरावा केला जावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार - एकनाथ शिंदे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

देवेंद्र फडणवीस आक्रमक

भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला.

यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही.

सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल. असा संतप्त सवाल उपस्थित केला.

सरोज आहिर बाळाला घेऊन अधिवेशनात

आमदार सरोज आहिर यांनी बाळाला घेऊन अधिवेशनात उपस्थिती लावली. मात्र, त्यांची गैरसोय झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नागपूरच्या अधिवेशनात मला हिरकणी कक्ष मिळालेलं. पण आत्ता मुंबई मधील अधिवेशनात दिलेल्या हिरकणी कक्षात खुप धुळ आहे. माझ्या बाळाला बर नाही आहे.

तरी मी जनतेचे प्रश्न मांडण्या करता मी इथे आली आहे. सुडाच राजकारण सोडून तुम्ही काम करा. सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही. मी आत्ता अधिवेशनात जात नाही आहे .उद्या जर व्यवस्था झाली नाही तर मी उद्या नाशिक ला निघून जाईन. असा इशाराही आहिर यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT