Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवार गटाचं ठरलं...कोणत्या जागांवर करणार दावा? 288 जागांच्या सर्व्हेची तयारी! भाजप-शिवसेनेच्या चिंतेत वाढ?

Maharashtra Assembly Elections 2024: महायुतीतील घटक पक्षांनी आधीच सर्व्हे करायला सुरुवात केली आहे. भाजपने आपण मोठा भाऊ असल्याचे आधीच घोषित केले आहे. त्यामुळे जागावाटप कसे होणार, हा प्रश्न आता उभा राहिला आहे.

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरात तयारी करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 288 जागांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील चिंतेत वाढ झाली आहे.

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्या. यावेळी पक्षाने त्या जागांसोबतच इतर जागांचा देखील आढावा घेण्याचे ठरवले आहे. या सर्व्हेमध्ये नवाब मलिक यांच्या जागांचाही समावेश असेल. सर्व्हेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मजबूत असतील, त्या जागांवर दावा सांगण्यात येणार आहे.

महायुतीची तयारी आणि अजित पवारांची वक्तव्य-

महायुतीतील घटक पक्षांनी आधीच सर्व्हे करायला सुरुवात केली आहे. भाजपने आपण मोठा भाऊ असल्याचे आधीच घोषित केले आहे. त्यामुळे जागावाटप कसे होणार, हा प्रश्न आता उभा राहिला आहे. अजित पवारांनी 288 जागांचा सर्व्हे करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

प्रफुल पटेल आणि अजित पवारांचे मोठे वक्तव्य-

अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल पटेल यांनी माहिती दिली की, आमदार परत गेले तर नव्या लोकांना संधी देऊ. अजित पवारांनी देखील मोठे वक्तव्य केले की, आमच्याकडे अनेक नवे उमेदवार आहेत. त्यांनी महायुतीत राष्ट्रवादीला भाजपची मते मिळत नाहीत यावर स्पष्टीकरण दिले. रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मते मिळाली, त्यामुळे मते ट्रान्स्फर होत नाहीत हे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती राहील, असा त्यांनी दावा केला.

आदित्य ठाकरे यांचे मिशन विधानसभा-

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार आहेत. मावळ लोकसभेतील पराभवानंतर ते कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत. दुपारी 2.30 वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे आणि सायंकाळी 5 वाजता उरण विधानसभा येथील जे एन पी टी येथील मल्टीपर्पज हॉल येथे आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

अजित पवार गटाच्या या सर्व्हेच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या चिंतेत वाढ होणार असून, महाविकास आघाडीच्या तयारीला टक्कर देण्यासाठी महायुतीने देखील जोरात तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

SCROLL FOR NEXT