Maharashtra Assembly Elections  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahadev Jankar: "104 जागेवर तयारी, मात्र 200..."; लोकसभेत पराभवानंतर विधानसभेसाठी जानकरांची मोठी मागणी, महायुतीला दिला इशारा!

Maharashtra Assembly Elections : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत जानकरांनी विधान परिषदेतिल ११ जागांमधील एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच, केंद्रात राज्यसभेची एक जागा मिळाली पाहिजे अशीही त्यांची मागणी आहे.

Sandip Kapde

राज्यातील आगामी विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने महाविकास आघाडीत आत्मविश्वास निर्माण झाला आहे, तर महायुती देखील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे.

महायुतीने परभणी लोकसभा मतदार संघात महादेव जानकर यांना संधी दिली होती. मात्र, या मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) चे संजय जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पराभव केला.

संजय जाधव यांना ६ लाख १ हजार ३४३ मताधिक्य मिळालं आहे. त्या पाठोपाठ पराभूत झालेले उमेदवार महादेव जानकर यांना ४ लाख ६७ हजार २८२ मताधिक्य मिळालं, वंचितचे उमेदवार हवामान तज्ञ पंजाब डख यांना ९५ हजार ९६७ मतं मिळाली.

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीच्या वाट्याला १७ जागा आल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, महादेव जानकर यांनी महायुतीला आता इशारा दिला आहे.

महादेव जानकरांनी विधान सभा निवडणुकीसाठी ५० जागांची मागणी केली आहे. सध्या १०४ जागांवर तयारी सुरु आहे, मात्र २०० जागांवर तयारी करायला सांगितले आहे. त्यांनी महायुतीला आपली दखल घ्यावी लागेल, असे म्हटले आहे.  

राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत जानकरांनी विधान परिषदेतिल ११ जागांमधील एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच, केंद्रात राज्यसभेची एक जागा मिळाली पाहिजे अशीही त्यांची मागणी आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी या मागण्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव राहील. यामुळे आगामी निवडणुका अधिकच रोमांचक होणार आहेत. जागावाटपात महायुती आणि महाविकास आघाडीला घाम गाळावा लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT